बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसाम हादरले! 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

दिसपूर | एकीकडे देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. मोठ्या संख्येत लोक आपला जीव गमवत आहेत. अशातच काही दिवसांपुर्वी नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे एकाच वेळी 24 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर वसईच्या रुग्णालयात आग लागली. या घटनेमध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. कोरोनासोबत देशात होणाऱ्या अनेक कारणांमुळे मृत्यूचं तांडव काही थांबेना. अशातच आता आसाममध्ये भुकंपाचे दोन मोठे धक्के बसल्याची घटना समोर आली आहे.

आज सकाळी सुमारे 7 वाजून 55 मिनिटांनी आसामधील गुवाहाटीमध्ये भुकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. यादरम्यान आसामला भूकंपाचे दोन धक्के बसले आहेत. यातील पहिला धक्का हा 7 वाजून 55 मिनिटांनी बसला आणि काही मिनिटांनी दुसरा धक्का बसला. आसामसह उत्तर बंगाल आणि इतर राज्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबतची अधिक माहिती समोर आली नसून या भूकंपांमुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहेत.

भूकंप येताच अनेकांनी घरातून बाहेर येऊन आपला बचाव केला. मात्र बऱ्याच घरांना तडा गेला आहे. याबाबतची माहिती आसामचे आरोग्य मंत्री हिमंता बिस्वा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. एवढंच नाही तर याबाबतचं ट्विट शेअर करताना त्यांनी फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसामला भूकंपाचा मोठा झटका बसल्याचं सांगितलं आहे. तसेच सर्व नागरिक सुरक्षित असल्याची आपण प्रार्थना करत असून लोकांना सावध राहण्याची सूचना देखील त्यांनी यावेळेस दिली आहे. याआधी सिक्किममध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती.

थोडक्यात बातम्या-

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

धोका वाढला! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, जाणुन घ्या मागच्या 24 तासातील आकडेवारी

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

सावधान! महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; जाणुन घ्या धक्कादायक आकडेवारी

“महाराष्ट्रात असेच कठोर निर्बंध कायम ठेवावे लागतील”; टास्क फोर्सचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More