बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसामच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतली शपथ

गुवाहाटी | काही दिवसांपूर्वी आसामची विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला विजय मिळवता आला. परंतु मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला कमी जागेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना परत मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलं.

आसाम विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा सर्वानंद सोनोवाल बसणार की हेमंत बिस्वा शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार यावरून भाजपच्या गोटात अनेक चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, शनिवारी झालेल्या भाजप विधिमंडळ दलाच्या बैठकीमध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.

हेमंत बिस्वा शर्मा हे अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये ते स्टार प्रचारक म्हणूनही होते. आज हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसेच त्यांच्या बरोबर इतर 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपच्या 10, एजीपीच्या 2 आणि युपीपीएलच्या एका आमदाराचा समावेश आहे.

भाजप विधिमंडळ दलाच्या बैठकीमध्ये सर्वानंद सोनोवाल यांनीच हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली आणि हेमंत बिस्वा शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

थोडक्यात बातम्या –

उजनीचं पाणी पेटलं! “एक थेंबही पाणी देणार नाही, अन्याय झाला तर राजीनामा देईल”

ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत बाजार समिती संचालकांकडे मागितली खंडणी

येत्या 3 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ करणार ‘या’ देशाचा दौरा; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा

कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करायला गेले 100 जण, 21 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More