कार्यकर्त्यांचा अतिउत्साह अंगलट, फटाक्यांची ठिणगी उमेदवाराच्या केसावर पडली अन्..

Assembly Election 2024 Major accident due to firecrackers in kalyan

Assembly Election 2024 | राज्यातील निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. येत्या 20 नोव्हेंबररोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर 23 नोव्हेंबररोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. अशातच कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे प्रचाराच्या रॅलीदरम्यान उमेदवारासोबत विचित्र प्रकार घडला आहे. (Assembly Election 2024)

कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवाराच्या जीवाशी बेतले आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दाखवलेला अतिउत्साह राकेश मुथा यांना चांगलाच भारी पडलाय.

राकेश मुथा यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

राकेश मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. यावेळी इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाकेदेखील लावण्यात आले. त्याचवेळी फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर पडली. (Assembly Election 2024)

फटाक्याच्या ठिणगीमुळे राकेश मुथा यांच्या केसांनी लगेच पेट घेतला. यानंतर कार्यकर्त्यांनी लगेच ही आग विझवली.त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची टळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचार करण्यात हा दाखवलेला अतिउत्साह उमेदवाराला चांगलाच भारी पडल्याचं यातून दिसून आलं.

कोल्हापुरात उमेदवारावर जीवघेणा हल्ला

दुसरीकडे, कोल्हापुरात एका उमेदवारावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूरमधील करवीर विधानसभा मतदारसंघातील (karvir assembly constituency) जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

संताजी घोरपडे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत असताना मनवाड येथे काही व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली होती. या हल्ल्यात घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. अंतिम टप्प्यात उमेदवारांसोबत अशा धक्कादायक घटना घडल्याचे यावेळी दिसून आले. (Assembly Election 2024)

News Title :  Assembly Election 2024 Major accident due to firecrackers in kalyan 

महत्वाच्या बातम्या –

मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना ‘या’ उमेदवारावर जीवघेणा हल्ला, कोल्हापुरात खळबळ

आज संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होणार!

मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का

“मला सिगरेटचे चटके…”, बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सलमानवर केले गंभीर आरोप

प्रतिभा पवारांना अडवलं, सोशल मीडियावर अजित पवारांविरोधात संताप

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .