बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोथरूडमधील वाड्या-वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार; चंद्रकांत पाटलांचा शब्द

पुणे | विक्रमी वेगाने विकसित झालेल्या कोथरूडला अद्ययावत नागरी सुविधा पुरवण्या वर आगामी सरकार प्राधान्य असेल. त्यामध्ये कोथरूडमधील वाड्या-वस्त्याचा चेहरामोहरा बदलणार, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वोत्तम सुविधा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असं कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते आज कोथरुडमध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 11 मध्ये आयोजित पदयात्रेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाडी-वस्तीमध्ये फटाक्या फोडत ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून ब्राह्मण महासंघाने जोरदार विरोध केला होता. त्यानंतर काही राजकीय घडामोडींनंतर त्यांना कोथरुडकरांनी पाठिंबा दिला. त्यानंतर आता कोथरुडकरांच्या सेवेला मी तत्पर आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More