बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

लखनऊ | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशमधील वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्ष आता तयारीला लागल्याचं दिसत आहे. काँग्रेसने देखील महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा चेहरा समोर करत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. अशातच आता उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशच्या काँग्रेस खासदार आदिती सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या रायबरेली जिल्ह्यामधील गढ मतदारसंघाच्या आदिती सिंह या आमदार आहे. 2017 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

एकेकाळी उत्तर प्रदेशात आदिती सिंह यांच्या राहुल गांधींसोबत लग्नाच्या अफवा सुरू होत्या. काही काळानंतर या अफवा बंद देखील झाल्या होत्या. मात्र, आदिती सिंह यांच्या जाण्यामुळे आता सोनिया गांधी यांना देखील मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून आदिती सिंह काँग्रेसवर सात्त्याने टीका करताना देखील दिसत होत्या. पक्षश्रेष्ठींवर त्यांची नाराजी होती, असं देखील जाणवत होतं. मात्र, अखेर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागला, स्वत: दिली माहिती

महिलेसोबतचा व्हिडीओ!, आखाडा परिषद अध्यक्ष आत्महत्येबाबत धक्कादायक खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More