नवी दिल्ली | उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आज या पाच राज्यांकडे लागलं आहे. (Assembly Election Results 2022)
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेच्या 403, उत्तराखंड (Uttarakhand) विधानसभेच्या 70, गोवा (Goa) विधानसभेच्या 40, पंजाब (Punjab) विधानसभेच्या 117, मणिपूर (Manipur) विधानसभेच्या 60 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणी होणार आहे. सुरूवातीच्या अर्ध्या तासातच 2022च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरूवात होईल.
सर्वात आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी होणार आहे आणि त्यानंतरच ईव्हीएम (EVM) उघडलं जाणार आहे. या पाज राज्यातील निवडणुकात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तराखंडात आप (AAP) किंग मेकर ठरू शकतं तर उत्तर प्रदेशात भाजप (BJP) वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशला मिनी लोकसभा देखील म्हटलं जातं. त्यामुळे पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लागलं आहे. उत्तर प्रदेशची जनता कोणाला कौल देणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“…हे तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखंच”, उच्च न्यायालयाचे ताशेरे
“घातपाताची आम्हाला शंका होती, आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते अन्…”
“1993च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या, उद्धवजी मांडीला मांडी लावून…”
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ सुट्या, केंद्र सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
“उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल तर सोडून द्या, सरकार तुम्हाला… “
Comments are closed.