आज महानिकाल! ‘या’ 20 मतदारसंघांवर अख्ख्या महाराष्ट्राची नजर, मोठी उलथापालथ होणार?

Assembly Election Results 2024 | आज 23 नोव्हेंबररोजी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोध महायुती असा थेट सामना झाला असून यात कोण बाजी मारणार याचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता निकालाकडे असणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरुषांनी तर 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिलांनी आणि 1,820 अन्य जणांनी मतदान केलं आहे. (Assembly Election Results 2024 )

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल आज जाहीर होत आहे. यावेळी लाडक्या बहीण कोणत्या भावाला निवडून आणणार ते पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. यावेळी बंडखोर उमेदवारांच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष असेल. कारण, अनेक मतदारसंघात युतीत असूनही काही जणांनी उमेदवार दिले. तर, काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या आकड्यांच्या गणितात या अपक्षांची देखील भूमिका महत्वाची ठरणार आहे.

आज सकाळी 8 वाजता 288 केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार आहे.  सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत टपाली मतपत्रिकांची तर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8 :30 वाजता सुरू होईल.

‘या’ 20 मतदारसंघांवर सर्वांचीच नजर

1. बारामती : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं आहे. युगेंद्र यांच्या पाठीशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली ताकद उभी केल्याने या मतदारसंघात रंगतदार लढत झाली आहे.

2. सिल्लोड सोयगाव : सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून सुरेश बनकर हे मैदानात आहेत. हा मतदार संघ ही या विधानसभेत जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे. (Assembly Election Results 2024 )

3. माहीम : या मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. माहीम मधून प्रथमच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम मध्ये यावेळी तिरंगी लढत बघायला मिळत आहे. येथे मनसेकडून अमित ठाकरे तर महाविकास आघाडी कडून महेश सावंत व शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

4. कराड दक्षिण : या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आणि महायुतीकडून भाजपचे अतुल भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण आणि कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे येथे कोण बाजी मारणार ते पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे.

5. शिरूर : या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी कडून अशोक पवार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येथे माऊली कटके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Assembly Election Results 2024 )

6. सांगोला : या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून ‘काय झाडी काय डोंगर’ फेम शहाजीबापू पाटील तर महाविकास आघाडी कडून दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख देखील येथे निवडणूक मैदानात आहेत.

7. भोसरी : या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून महेश लांडगे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. यांच्यापैकी कोण बाजी मारणार ते उद्या स्पष्ट होईल.

8. परळी : बीडच्या परळी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष झाला आहे. येथे अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे तर शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. (Assembly Election Results 2024 )

9. आंबेगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा एक जिल्ह्यातला लक्षवेधी मतदारसंघ. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे बडे नेते दिलीप वळसे पाटील सलग आठव्यांदा आमदार होण्यास उत्सुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम हे निवडणूक रिंगणात आहेत.

10. कागल : या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी समरजीत घाटगे यांना संधी दिली आहे. घाटगे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत तुतारी फुंकली. ते महायुतीविरोधात मैदानात आहेत. या निवडणुकीत समरजीत घाटगे यांच्या विरोधात अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे रिंगणात आहेत. कोल्हापूरच्या या जागेच्या निकलाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

11. इंदापूर : बारामतीच्या शेजारीच असलेल्या इंदापूरमध्ये यंदा राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांना शरद पवार गटाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आव्हान आहे. मागील 10 वर्षांपासून आमदार असलेल्या दत्तात्रय भरणे यांना अनुभवी हर्षवर्धन पाटील शह देणार का, हे पाहणे उत्सुकाचे असणार आहे.  (Assembly Election Results 2024 )

12. पाटण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यासमोर पाटणमध्ये यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हर्षद कदम आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत पाटणकर यांचं आव्हान आहे.

13. कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांना पराभव केला होता. यंदाही हे दोन्ही उमेदवार आमने-सामने आहे.

14. तासगाव-कवठे महंकाळ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचे  आव्हान आहे. त्यामुळे यंदा तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून कोण बाजी मारतं, यावर सर्वांच्या नजरा असतील.

15. इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात सलग 35 वर्षे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. यंदा अजित पवार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना जयंत पाटलांविरोधात उमेदवारी दिली आहे.  (Assembly Election Results 2024 )

16. माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी निवडणुकीत माघार घेत पुत्र रणजीत शिंदे यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पवार यांनी अभिजीत पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. तर अजित पवार यांनी मीनल साठे यांना उमेदवारी दिली.

17. येवला : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे अनेक वर्षांपासून येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. येथे शरद पवारांनी भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांच्या रुपाने मराठा चेहऱ्याला संधी दिली आहे.

18. काटोल : काटोल मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिल देशमुख यांनी माघार घेत पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने कडवे आव्हान दिले.

19. कोपरी-पाचपाखाडी : ठाण्यातील या मतदारसंघातून स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केदार दिघे यांना उमेदवार दिली आहे. या मतदारसंघातील निकालाची उत्सुकता आहे. (Assembly Election Results 2024 )

20. वरळी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात यंदा शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवत आहेत. (Assembly Election Results 2024 )

News Title : Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ 35 बंडखोरांचा निकाल करणार गेम?, महायुती-मविआची चिंता वाढली

पश्चिम महाराष्ट्रात कोण उधळणार विजयी गुलाल?, जाणून घ्या एका क्लिकवर

शनिदेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींना राजकारणात मिळणार मोठं यश!

मतदान होताचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! CNG च्या दरात वाढ

योग्य न्याय मिळाला नाही!, मुंबईतील बड्या भाजप नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश