Top News विधानसभा निवडणूक 2019

“मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष अन् मुख्यमंत्री म्हणतात विरोधात पैलवान नाही”

मुंबई | आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत चांगलाच समाचार घेतला.

मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहित नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

आपल्या भागाचा विकास करणारा एक उत्तम उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. तुमच्या सुख-दुःखात उभं राहणारं व्यक्तिमत्व निवडून येण्याची गरज आहे. राजीव देशमुख यांचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यात आपण कमी पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या