मोठी बातमी! दोन्ही ठाकरे एकत्र येणार, मनसे देणार ठाकरे गटाला पाठिंबा?

Assembly Elections 2024 MNS Support Thackeray Group

Assembly Elections 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी जवळपास 7 हजारपेक्षा जास्त उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत प्रथमच दोन्ही ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याचं कळतंय. (Assembly Elections 2024)

मनसे आमदार राजू पाटील यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे. त्यांनी महाविकास आघाडीला मदत करणार असल्याचं जाहीर केलंय. याची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे. राजू पाटील यांनी नुकतीच अंबरनाथमील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांची भेट घेतली आहे.

राजू पाटील यांनी जाहीर केली भूमिका

एकमेकांची गळाभेट घेत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका राजू पाटील यांनी घेतली आहे. तर, मविआचे उमेदवार राजेश वानखेडे यांनीही मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, असं म्हटलं आहे.

राजू पाटील यांच्या भूमिकेबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजू पाटील यांनी राजेश वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचं कारणच हे आहे की, त्या वेळेला केवळ राज साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी श्रीकांत यांना मदत केली होती. त्यांची इच्छा नसतानाही श्रीकांत यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि आता राजू पाटील यांच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. हा अन्यायच आहे”, असं यशवंत किल्लेदार म्हणाले आहेत. (Assembly Elections 2024)

अंबरनाथमध्ये मनसे देणार ठाकरे गटाला पाठिंबा

दरम्यान, मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने राजू पाटील यांच्या विरोधात सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे. येथे मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार होती. मात्र, याच जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मनसे नेते अंबरनाथमध्ये थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. (Assembly Elections 2024)

News Title –  Assembly Elections 2024 MNS Support Thackeray Group

महत्त्वाच्या बातम्या-

“प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत”

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी; डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

पवार कुटुंबात फूट; 50 वर्षांत ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार- संभाजीराव पाटील निलंगेकर

‘धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार’; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .