विधानसभेत महाविकास आघाडी मारणार बाजी?, सर्व्हेतून मोठी माहिती समोर

Assembly Elections 2024 | राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी कोण अर्ज मार्गे घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. यानंतर निवडणुकीत कोणत्या ठिकाणी कोण लढणार, ते स्पष्ट होईल. अशात महाविकास आघाडीच्या बाजूने एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. (Assembly Elections 2024)

एका प्रसिद्ध सर्व्हेत महाविकास आघाडी बाजी मारणार, असा दावा करण्यात आलाय. ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने नुकताच एक सर्व्हे केला. यामध्ये महाविकास आघाडी राज्यात बाजी मारणार, असं समोर आलंय. मविआला विधानसभेत तब्बल 157 जागा मिळणार असल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलंय.

राज्यात महाविकास आघाडी मारणार बाजी?

राज्यात यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. आता नुकत्याच झालेल्या या सर्व्हेमध्ये महायुतीला 117 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार, असं यातून दिसून येतंय.

महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे प्रमुख पक्ष आहेत. या दोन्ही आघाड्यांकडून आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. (Assembly Elections 2024)

शिंदे गटाला केवळ 23 जागा मिळणार?

या निवडणुकीचा झिरो मेगा प्री-पोलने एक सर्व्हे केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला भक्कम यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 23 जागा मिळणार, असं देखील म्हणण्यात आलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ 14 जागा मिळणार असल्याचा देखील दावा करण्यात आलाय. (Assembly Elections 2024)

News Title –  Assembly Elections 2024 MVA victory in survey

महत्त्वाच्या बातम्या-

दिवाळी पाडव्याला मिळाली आनंदवार्ता, सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा

महायुतीला धक्का, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

संभाजीराव पाटील निलंगेकरांची ताकद वाढली, संपूर्ण निलंगा भाजपमय

मोठी बातमी! दोन्ही ठाकरे एकत्र येणार, मनसे देणार ठाकरे गटाला पाठिंबा?