राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एक सर्व्हे समोर

Assembly Elections 2024 victory survey

Assembly Elections 2024 | राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबररोजी मतदार पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच नेते-मंडळींच्या प्रचारसभा सध्या गाजत आहेत. 20 तारखेला मतदान पार पडल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबररोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच वेगवेगळे सर्व्हे समोर येत आहेत. (Assembly Elections 2024)

ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यामध्ये महाविकास आघाडी राज्यात बाजी मारणार, असं म्हटलं गेलं. अशात आणखी एक सर्व्हे समोर आला आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने सर्व चित्र असल्याचं म्हटलं गेलंय. लोकपोलने विधानसभेचा सर्व्हे केलाय. यामध्ये मविआला घवघवीत यश मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय.

राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?

या सर्व्हेत महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 151 ते 162 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करणार असल्याचे यातून दिसून येत आहे. असं झाल्यास राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते. (Assembly Elections 2024)

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 37 ते 40 टक्के, तर महाविकास आघाडीला 43 ते 46 टक्के मते मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. तसेच, या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसारख्या पक्षांना फारशी चमक दाखवता येणार नाही, असंही या सर्व्हेत म्हटलंय.

महायुती vs महाविकास आघाडी

झिरो मेगा प्री-पोलने तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचाही दावा केला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 23 जागा मिळणार, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ 14 जागा मिळणार असल्याचा दावा या सर्व्हेमध्ये करण्यात आला होता. अशात आणखी एक सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने आला आहे. मात्र, हे चित्र कितपत खरे ठरणार, ते 23 तारखेलाच समजणार आहे. (Assembly Elections 2024)

यंदा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे प्रमुख पक्ष आहेत. या दोन्ही आघाड्यांकडून आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. आता निवडणुकीत कोण बाजी मारणार, त्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. (Assembly Elections 2024)

News Title –  Assembly Elections 2024 victory survey

महत्त्वाच्या बातम्या-

शाळकरी विद्यार्थ्यांना या महिन्यात सलग 4 दिवस सुट्ट्या मिळणार, कारण..

खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किंमती?

दिशा सालियन प्रकरणी पुन्हा चौकशी लावणार, ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना इशारा

आज कार्तिक पौर्णिमेला ‘या’ राशींवर राहणार विष्णुदेव व लक्ष्मीची कृपा!

संभाजी पाटील निलंगेकरांचा वंचित बहुजन आघाडीला झटका!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .