Assembly Elections 2024 | महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मतदानासाठी आता अवघे 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सगळीकडे सध्या प्रचारसभा रंगताना दिसून येत आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांकडून दिल्लीतील बडे नेते हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अशात एका प्रसिद्ध सर्व्हेत विधानसभेत कोण बाजी मारणार, याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. (Assembly Elections 2024)
MATRIZE चा ओपीनियन पोल समोर आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळणार, असं म्हटलं आहे. राज्यात एकूण 288 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे.
राज्यात कोण मारणार बाजी?
महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे प्रमुख पक्ष आहेत. या दोन्ही आघाड्यांकडून आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. (Assembly Elections 2024) या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार आणि कोण बाजी मारणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वीच हा सर्व्हे समोर आला आहे.
या सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुती 145 ते 165 जागा जिंकून येईल, असं समोर आलंय. तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे. मात्र, हे चित्र खरं ठरेल की खोटं हे मात्र आता 23 तारखेलाच समजणार आहे.
महायुती vs महाविकास आघाडी
पश्चिम महाराष्ट्र एकूण 70 जागा
महायुती- 31 ते 38 जागा
महाविकास आघाडी- 29 ते 32
विदर्भ – एकूण जागा 62
महायुती- 32- 27 (Assembly Elections 2024)
महाविकास आघाडी- 21 ते 26
मराठवाडा एकूण जागा 46
महायुती- 18 ते 24
महाविकास आघाडी- 20 ते 24
मुंबई- 36
महायुती- 21 ते 26 (Assembly Elections 2024)
महाविकास आघाडी- 10 ते 13
ठाणे- कोकण एकूण जागा- 39
महायुती- 23 ते 25
महाविकास आघाडी- 10 ते 11
उत्तर महाराष्ट्र- 35
महायुती- 14 ते 16 (Assembly Elections 2024)
महाविकास आघाडी- 16 ते 19
News Title – Assembly Elections 2024 victory survey
महत्त्वाच्या बातम्या-
मनसेतून वंचित मग ठाकरे गटात गेले, आता वसंत मोरे थेट तुतारी फुंकणार?
“जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणार”; संभाजी निलंगेकरांची घोषणा
परळीत बहीण भाऊ जोमात! “धनुभाऊंनी कमळाच्या चिन्हावर…”
उद्धव ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; बडा नेता बांधणार शिवबंधन
खासदार महाडिकांवर गुन्हा दाखल; लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणाले?