दिवाळीच्या फराळातून पैसे वाटप; सांगलीत शरद पवारांचा उमेदवार अडचणीत?

Assembly Elections Allegation of distribution of money in sangali

Assembly Elections | राज्यात विधानसभा निवडणूकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज 4 नोव्हेंबररोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरीला रोखण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशात सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. तासगाव येथे फराळाच्या पाकीटातून पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Assembly Elections)

तासगावमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी आता भरारी पथकाने कारवाई देखील केली आहे.

रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी शरद पवार पक्षाचे दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. (Assembly Elections)

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील यांनी मी रोहित पाटील यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर तासगाव येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे पाकीट देत होतो, असं म्हटलं आहे. याची माहिती भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी याचा तपास केला.

दिवाळीच्या फराळातून 3000 रुपये वाटल्याचा आरोप

यानंतर शरद पवार पक्षातील या कार्यकर्त्याकडे पांढऱ्या रंगाची 16 पाकिटे आढळली. त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये , पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपये इतकी रक्कम आढळून आली. दरम्यान, पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते.  (Assembly Elections)

अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर, पैसे वाटताना सापडलेला सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याला चौकशी सुरू असताना छातीत दुखण्याचा त्रास झाल्याने त्याला तासगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

News Title – Assembly Elections Allegation of distribution of money in sangali

महत्त्वाच्या बातम्या-

सिनेइंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अजितदादांच्या उमेदवारांना शिंदेंकडूनच आव्हान; आता दोन्ही उमेदवार नॉट रीचेबल

“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी

आज सोमवार, महादेव ‘या’ ३ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .