बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, कारणही सांगितलं…

पणजी | देशात आगामी काळात मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. परिणामी प्रत्येक पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांची नजर असते. महाराष्ट्राच्या शेजारीच असणारं छोटं राज्य गोवा सध्या चांगलंच राजकीय चर्चेत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी (Election Encharge) आहेत.

देवेंद्र फडणवीस सध्या सातत्यानं गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी फडणवीस ज्या हाॅटेलमध्ये थांबले होते त्या हाॅटेलमध्ये त्यांच्या भेटीला गोवा काॅंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आल्याची बातमी वेगानं सर्वत्र पसरली होती. फडणवीस यांनी थेट काॅंग्रेसच्या अध्यक्षांनाच आपल्या गोटात सामिल केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण आता या घटनेवर खुद्द काॅंग्रेस नेत्यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

गोवा काॅंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एलेक्स रेजिनाल्ड लाॅरेन्स हे फडणवीस ज्या हाॅटेलात थांबले होते तिथंच निवडणूक रणनितीकारांची भेट घेण्यासाठी गेले होते, असं खुद्द लाॅरेन्स यांनीच म्हटलं आहे. मला माहिती नव्हतं की भाजप नेते या हाॅटेलमध्ये थांबले आहेत. पण मला जेव्हा समजलं की इथं भाजप नेते आहेत तेव्हा लगेच मी त्या ठिकाणाहून परत आलो, असं लाॅरेन्स म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपचं प्रसिद्ध ऑपरेशन लोटस हे गतनिवडणुकीत गोव्यात राबवण्यात आलं होतं. परिणामी गोवा विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकूनही गोव्यात काॅंग्रेसला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. फडणवीस आणि लाॅरेन्स यांच्या या प्रकरणानं पुन्हा गतनिवडणुकीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

सावधान, नव्या फंगसमुळे 2 डॉक्टरांचा मृत्यू, आधीच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मिळणार पैसे

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

“लग्न झालं, अजित पवार 48 तासांसाठी नवरदेव झाले अन् नवरी…”

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More