औरंगाबाद महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी हरिभाऊ बागडे आले मोटारसायकलवर!

Loading...

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभा सदस्याचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचले. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे चक्क मोटारसायकलवर आल्याचं पाहायला मिळालं.

कुंभेफळ जवळील रेल्वे क्रॉसिंगवर फाटक पडल्याने उशीर होत होता. भास्कर जाधव वाट पाहत असल्याने हरिभाऊ बागडे यांनी पायी चालत जाऊन रेल्वे रुळ ओलांडलं.

Loading...

एका मोटारसायकलस्वाराला त्यांनी हात दिला. चक्क हरिभाऊ मोटारसायकलवर बसून कुंभेफळला पोहोचले आणि तिथे त्यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्विकारला.

भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्षांकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजुरही केला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या