बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिधापत्रिका नसेल तर आधारकार्ड ग्राह्य धरून प्रत्येकाला धान्य द्या- देवेंद्र फडणवीस

मुंबई | ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्डसुद्धा नाही, अशांची यादी तयार करून, ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्र सरकारने राज्याला अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला आहे. साधारणत: राज्यात 9 कोटी लोक हे रेशनमधून धान्य घेत असतात. तीन महिन्यांचे धान्य मिळून 22 लाख मेट्रिक टन इतका साठा लागतो. त्यापैकी 20 लाख मेट्रिक टन धान्यसाठा हा राज्याला प्राप्त झालं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

केंद्राने दिलेलं अन्यधान्य हे पुर्णत: मोफत असून त्याच्या वितरणाचा खर्चसुद्धा केंद्र सरकार देणार आहे. त्यामुळे कोणत्याही रंगाची शिधापत्रिका असली तरी त्यांना धान्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका असलेल्या आणि नसलेल्या सर्वाना धान्य उपलब्ध करून देण्याची आज नितांत गरज आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य आणि 8 कोटी कुटुंबांना मोफत गॅस अशा अनेक बाबतीत प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली असल्याची महिती फडणवीस यांनी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती

महत्वाच्या बातम्या-

आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More