घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही 3 झाडे, पडेल पैशांचा पाऊस

Astro Tips l हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. बांधकामापासून ते घराच्या सजावटीपर्यंत वास्तूकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच घरामध्ये रोपे लावताना देखील वास्तु नियमांचे पालन करावे लागते. घरात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते. यामुळे सकारात्मक ऊर्जा पसरते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार,पिंपळासारखी असे काही झाडे आहेत जी घरासमोर लावणे शुभ मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अशी अनेक झाडे आहेत जी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यास देवी लक्ष्मीचा वास घरात राहण्यास मदत होते. तर आज आपण जाणून घेऊयात कोणती झाडे घरासमोर लावल्यास सुख-समृद्धी येते.

घरामध्ये ‘हे’ झाड लावा; मिळेल सुख शांती :

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शमीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते. यामुळे घरावर लक्ष्मीची कृपा होते. वास्तुशास्त्रानुसार शमीची वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते.

घराच्या मागील बाजूस केळीचे रोप लावणे मोठ्या प्रमाणात शुभ मानले जाते. घराच्या मागे केळीचे रोप लावल्याने घरात धनसंपत्ती वाढते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. गुरुवारच्या उपवासात केळीच्या रोपाच्या पूजेला खूप महत्त्व दिले गेले आहे. गुरुवारी व्रत केळीच्या रोपाची पूजा केल्याने लक्ष्मीचा वास होतो. यामुळे सुख-समृद्धी वाढते.

Astro Tips l मनी प्लांटमुळे घरात पसरते सकारात्मक ऊर्जा :

याशिवाय घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो. मनी प्लांट ही एक वनस्पती मानली जाते जी पैसे आकर्षित करते. हे झाड घराच्या प्रवेशद्वारावर लावणे शुभ मानले जाते. मात्र मनी प्लांट लावताना विशेष काळजी घ्यावी.

या झाडाची लागवड करताना लक्षात ठेवा की, या झाडाच्या फांद्या जमिनीवर पडू नयेत. मनी प्लांटच्या फांद्या दोरीच्या साहाय्याने वरच्या बाजूला बांधा. महत्वाचं म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर मनी प्लांट लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. यामुळे घरात सकारात्मक देखील ऊर्जा पसरते.

News Title – Astro Tips For Home

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!

फडवणीस शिवरायांचे दुश्मन…; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले

“आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का..”; सिंधुदुर्गातील राड्यावर सुप्रिया सुळे संतापल्या

…तर यांना घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन; नारायण राणेंची माविआला धमकी

‘तारक मेहता..’ मधील भिडे मास्टरने केली निर्मात्यांची पोलखोल?, मालिकाही सोडणार?