नाशिक महाराष्ट्र

केंद्रात भाजपची सत्ता येणार का?; ज्योतिष अधिवेशनात अजब भविष्य

जळगाव | लोकसभा निवडणुकीत भाजपचं पुन्हा सत्तेत येईल पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच कोसळेल, असं भाकित बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी वर्तवलं आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील ज्योतिष अधिवेशनात ते बोलत होते.

भाजपला निवडणुकीत 30 ते 40 टक्के जागांचा फटका बसेल, असा अंदाज देखील जकातदार यांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर सत्ता येईल अन्यथा त्यांना पराभवाला तोंड द्यावं लागेल, असंही जकातदार म्हणाले आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यामध्ये अडसर असून भाजपला 220 जागा मिळाल्या तर ते पंतप्रधान होतील नाहीतर त्यांना पंतप्रधानपदाला मुकावं लागेल, असा अंदाज देखील जकातदार यांनी वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग अवघड

मराठीतील नावाजलेले अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन

लेकीला 11 एकरांवर साकारायचीय शिवरांगोळी, वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज

मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलनाला बसणं ही गंभीर बाब- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या