आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ

Astrology today | आज 5 सप्टेंबररोजी वेशी योग जुळून आला आहे. सध्या सूर्य सिंह राशीत विराजमान आहे. तर कन्या राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह शुभ असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. आज जुळून आलेल्या शुभ योगाचा सिंह, तूळ धनुसह अन्य 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना फायदा मिळणार आहे. (Astrology today )

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने भगवान विष्णूचा त्यांच्यावर सदैव आशीर्वाद असेल. आता या राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ होणार, ते जाणून घेऊयात.

वेशी योगात ‘या’ राशी चमकणार

वृषभ रास : तुम्हाला तुमच्या कामातून चांगला लाभ मिळेल. तसेच, गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील आजचा दिवस शुभ आहे. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी गणेशोत्सवासाठी मोठी खरेदी कराल. आजचा दिवस प्रसन्न जाईल. (Astrology today )

सिंह रास : आज तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल.समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. वैवाहिक जीवनातील वाद संपुष्टात येतील.

तूळ रास : या राशीचे आगामी दिवस लाभदायक असणार आहेत. तुम्ही नियोजित केलेली सगळी कामे पार पडतील. विवाह स्थळ जुळून येईल. आर्थिक अडचणी दूर होतील. आज तुमचं नशीब तुमच्या बरोबर असेल त्यामुळे (Astrology today )तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही.

धनू रास : भगवान विष्णूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट मिळतील. यामुळे मन प्रसन्न राहील. आज दानधर्म करा.

मकर रास : आज तुम्हाला शुभ वार्ता मिळेल.गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. छोट्या-छोट्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबासोबत ट्रीपला जाल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. गप्पा-गोष्टी रंगतील. (Astrology today )

News Title –  Astrology today September 5

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार

शिल्पकार जयदीप आपटे सापडला, अटक होताच वकिलांकडून धक्कादायक गौप्यस्फोट

आज ‘या’ राशीवर बरसणार स्वामींची कृपा, दुःख-संकट दूर होणार

लाडक्या बहिणीमुळे सत्तेतल्या 3 भावांमध्येच वाद, अजित पवारांच्या ‘त्या’ करामती कारणीभूत

लाडकी बहीण नेमकी कुणाची?, अजित पवारांना मान्य नाही ‘मुख्यमंत्री’ शब्द?