योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद|योगी तुम्ही अंगठाछाप आहात, जर तुम्ही सुशिक्षीत असता तर निजाम पळून गेले नव्हते, हे तुम्हाला माहित असतं, असा जोरदार हल्लाबोल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

तेलंगणात जर भाजपची सत्ता आली तर निजामांसारखं ओवैसींनाही पळवून लावू, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. यावर बोलताना ओवैसींनी योगींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

माझ्या वडिलांनी भारतात जन्म घेतला आहे. भारत माझा देश आहे, त्यामुळे भारतातून आम्हाला कुणीही पळवून लावू शकत नाही, असंही ओवैसी म्हणाले.

तुमचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. जेव्हा चीन सोबत युध्द झाले होते, तेव्हा निजामांनी देशाला सोनं दान केले होतं, आणि तुम्ही म्हणता निजाम पळून गेले होते; असाही पलटवार ओवेसींनी केला.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”

-चोपडा पोलीस निरीक्षक मारहाण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली

आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

-महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत

-राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता