बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसी रजनीकांतवर भडकले!

नवी दिल्ली | कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वागत केलं आहे. रजनीकांत यांनी मोदी-शहा यांना कृष्ण-अर्जुन संबोधून त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र मोदी-शहांच्या कौतुकामुळे एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी रजनीकांत यांना फैलावर घेतलं आहे.

जर मोदी-शहा कृष्ण अर्जुन असतील तर या परिस्थितीत कोण पांडव आणि कोण कौरव ? असा प्रश्न ओवैसींनी रजनीकांत यांना विचारला आहे.

काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर अनेक स्तरातून मोदी-शहा जोडीचं कौतुक होत असतानाच दाक्षिणात्य कलाकार रजनीकांतने देखील मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. मात्र मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसींनी रजनीकांतवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, देशात आणखी एकदा महाभारत घडवायचंय का? असा प्रश्नही ओवैसींनी रजनीकांत यांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दुभती जनावरं देण्याची योजना; तुम्ही अशी करू शकता मदत

-“आपल्याला कोणाची साथ नाही; मुर्खांच्या स्वर्गात राहू नका!”

-शिवसेना आमदाराचं स्तुत्य पाऊल; पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

-विंग कमांडर अभिनंदन यांचा स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ने गौरव होणार!

-काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मांडणार पूरग्रस्तांच्या व्यथा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More