बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांबाबत मोदी सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली |अफगाणिस्तानात सध्या विदारक परिस्थिती असल्याचं पहायला मिळतंय. खुद्द राष्ट्रपतींनीच पळ काढल्यानं अफगाणी नागरिक देश सोडण्याची धडपड करताना दिसत आहे. त्यामुळे विमानतळावरची काही धक्कादायक चित्र देखील समोर आली आहे. याच पाश्वभूमीवर आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

अफगाणिस्तानात चालू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक महत्वाची बैठक झाली. पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल यांच्यात बैठक झाली. त्यावेळी अजित डोवाल यांनी पंतप्रधांनांना अफगाणिस्तानातील सर्व माहिती दिली. अफगाणिस्तानात असलेल्या अल्पसंख्यांक लोकांच्या सुरक्षिततेवर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

भारताने केवळ आपल्या नागरिकांचे संरक्षणच नाही तर, ज्या हिंदू आणि शिख अल्पसंख्यांक लोकांना भारतात येण्याची इच्छा आहे. त्या लोकांना संरक्षण द्याला हवं. तसेच त्यांना आश्रय देखील द्यायला हवा. भारताकडे डोळे लावून बसलेल्या सर्व नागरिकांना सर्व प्रकराची मदत केली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत म्हटल्याचं समोर येतंय.

दरम्यान, या बैठकीत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याबद्दल देखील चर्चा झाली. त्यानुसार एअर इंडियाने भारतीयांना सुरक्षित एअरलिफ्ट केलं आहे. याआधी सीएए आणि एनआरसीचा मुद्दा भारतात चांगलाच पेटला होता. त्यानंतर आता हिंदू आणि शिखांना आश्रय दिला तर मोदी सरकारला पुन्हा टीकेचा सामना करावा लागू शकतो.

 

थोडक्यात बातम्या-

एअरलिफ्ट यशस्वी! अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका

धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर जाणा- उद्धव ठाकरे

“लवकरच मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी होणार पुढील पंतप्रधान”

सारं जग झुकलं मात्र ‘हा’ पठ्ठ्या एकटा तालिबानपुढं उभा ठाकलाय, याचा गड अजूनही अभेद्य कसा?

शरद पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, आता संभाजी ब्रिगेड ‘ही’ भेट पाठवणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More