बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भयानक दृश्यं, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एकाचवेळी 22 कोरोना बाधितांवर अत्यसंस्कार

अहमदनगर | कोरोनाने पहिल्या लाटेत पुणे आणि मुंबई सारख्या शहरांना झोडपून काढलं होतं. आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. आता फक्त शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. यातच वेगवेगळ्या शहरातून धक्कादायक घटना समोर येत आहेत. अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीतील काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे.

अहमदनगर अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले. तर दिवसभरात 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत दाहिनीच्या कमतरतेमुळे अमरधाममध्ये हे हृदयद्राव्य चित्र पाहायला मिळालं आहे. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 जणांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे बाकीच्या 22 जणांचे अंत्यसंस्कार एकाच वेळी सरणावर करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुळे आतापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं मोठं आव्हान आहे. शववाहिनेचा तुटवडा देखील जिल्ह्यात जाणवत आहे. एकाच वेळी शववाहिनीतून 6 जणांचे मृतदेह भरून नेण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.

दरम्यान, बीडच्या अंबाजोगाईमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांना एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ बीडच्या महापालिकेवर आली होती. त्यांनतर असाच प्रकार राज्यात विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

‘त्या’ प्रकरणात माझीही चौकशी करा; अजित पवारांचं खुलं आव्हान

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी मात्र सुखरुप

पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More