बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार

मुंबई | महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्या असतानाच आता मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कोरोनाकाळात राज्य सरकारतर्फे निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्यामुळे रेल्वे स्थानकावरही फारशी गर्दी पाहायला मिळत नाही.

दरम्यान, दादर रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहणाऱ्या एका महिलेला एका माथेफिरू तरुणाने अचानक घट्ट मिठी मारली आणि नंतर घटनास्थळावरून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे स्थानकावर उपस्थित इतर प्रवासी आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कामावरून घरी परतत असताना फलाटावर बदलापूर रेल्वेची वाट बघत असलेल्या महिलेला संजय यादव या आरोपीने अचानक पाठीमागुन येऊन मिठी मारली, यामुळे संबंधित महिला गोंधळुन गेली. तिला काही कळायच्या आतच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला, परंतु पोलिसांनी व नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला जेरबंद केलं.

संबंधित घटनेनंतर पीडीत महिलेने आरोपीविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात दादर पोलिसांनी वडाळ्यात राहणाऱ्या संजय यादव या माथेफिरु मजुराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घडलेल्या घटनेमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून महिलांमध्ये काहीकाळ भितीचं वातावरण पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

सावधान! देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी

“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”

श्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More