राष्ट्रगीत सुरु असताना ते दोघे चक्क सेल्फी काढत होते!

राजौरी | जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये राज्यपालांच्या समोर दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताला उभं न राहता राष्ट्रगीताचा अवमान केला. एवढंच नव्हे तर राष्ट्रगीत सुरु असताना ते चक्क सेल्फी काढत होते. 

बाबा गुलाम शहा बादशहा विद्यापीठात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल एन. एन. वोहरा देखील उपस्थित होते. यावेळी हा प्रकार घडला. 

दोन विद्यार्थ्यांनी केलेला राष्ट्रगीताचा अवमान कॅमेऱ्यात कैद झालाय. या विद्यार्थ्यांवर कारवाई होणार असल्याचं कळतंय. मात्र या प्रकारावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय.

पाहा व्हिडिओ-