बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा”

मुंबई | एकीकडे राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सतत मोठी भर पडत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनावरील लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. कोरोनाच्या लसींच्या कमी पुरवठ्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

भाजपच्या 105 आमदारांना महाराष्ट्रातील जनतेनंच निवडून दिलंय. मग, या 105 आमदारांना मतदान दिलेले लोकं कोण आहेत. जो शब्द तुमच्या लोकांनी वापरलाय, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या, ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र जेवढा तुमचा आहे, तेवढा आमचाही आहे. महाराष्ट्राची जनता जेवढी तुमची आहे, तेवढी आमचीही आहे. सगळ्यांचा आहे हा महाराष्ट्र, असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे 50 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये 56 हजार 286 रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात 376 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाचे लसीकरण वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच त्यासाठी राज्याला दर आठवड्याला किमान 40 लाख डोस मिळाले पाहिजेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली होती.

दरम्यान, राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या – 

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही; प्रशासनाची धक्कादायक कबुली

लस उत्सवावरून राहूल गांधींचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केलं ‘हे’ आवाहन

“कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र कसा सांभाळणार”

…म्हणून रोहित शर्मा इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमार यादवनं सांगितलं कारण

फक्त दोन षटकार आणि कायरन पोलार्डच्या नावावर होणार ‘हा’ जबरदस्त विश्वविक्रम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More