बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रिटनच्या नव्या राजाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची तेव्हा चर्चा होती

नवी दिल्ली । 80 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. त्यांची गायिका बनण्याची इच्छा होती मात्र त्या अभिनेत्री बनल्या. ‘यादों की बारात’ आणि ‘दुश्मन दोस्त’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये पद्मिनी या बालकलाकार म्हणून दिसल्या. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामं केली मात्र ‘प्रेम रोग’ हा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे पद्मिनी यांची गणना 80 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. 

पद्मिनी या एक मोठ्या अभिनेत्री होत्या, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर मीडिया आणि चाहत्यांच्या नजर असणं साहजिक होतं. 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यांना अचानक बॉलीवूडच्या चित्रपटांचे शूटिंग पाहावेसे वाटले. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांना मुंबईतील एका स्टुडिओत नेण्यात आले. हा राजकमल स्टुडिओ होता जिथे पद्मिनी ‘आहिस्ता-आहिस्ता’ चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. जेव्हा त्यांना प्रिन्स चार्ल्स येणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्या स्वतः त्यांना भेटायला गेल्या. 

अभिनेत्री शशिकला देखील सेटवर हजर होत्या. त्यांनी चार्ल्सची आरती केली आणि पद्मिनी कोल्हापुरी यांनी चार्ल्सच्या गालावर चुंबन घेत पुष्पहार घातला. आता पद्मिनी कोल्हापुरेंची ही गोष्ट लोकांच्या समोर आली आहे. त्याकाळी एखाद्या अभिनेत्री समोरच्या व्यक्तीचे असे चुंबन घेणे सामान्य नव्हते. पडद्यावरही अशी दृष्ये खूप कमी शूट झाली आहेत. अशा परिस्थितीत लोकांना पद्मिनी यांचे हे कृत्य खूपच धाडसी वाटले. त्यावेळी, प्रिन्स चार्ल्सचं लग्न देखील झालं नव्हतं. त्यावेळी हि चुंबणाची कहाणी खूप चर्चेत आली. 

भारतात घडलेला हा किस्सा इतका रंगला की त्याची चर्चा ब्रिटनपर्यंत पोहोचली. या सर्व गोष्टी पद्मिनी कोल्हापुरेंसाठी डोकेदुखी ठरल्या. एका मुलाखतीत याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या होता की, या चुंबनामुळे त्यांना कदाचित खूप लाज वाटाली असावी. पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या होत्या, ‘या घटनेनंतर एकदा मी यूकेला गेले होते, तिथे इमिग्रेशन अधिकाऱ्याने मला विचारले की, प्रिन्स चार्ल्सचे चुंबन घेणारी तूच आहेस का?’

पद्मिनी म्हणाल्या की हे एक लहान चुंबन होते, ज्याची परदेशात जास्त काही चर्चा केली जात नाही. परंतु त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर पद्मिनींने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले. असे म्हटले जाते की त्यांना ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर देखील आली होती परंतु बोल्ड सीन्समुळे त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. पद्मिनी या सध्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी काही ना काही कारणाने त्या चर्चेत असतात. यावर्षी त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानी यांचे लग्न झाले.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More