बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

पुणे | शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आज पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं होतं तसेच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या उपचारांना अखेर अपयश आलं आणि उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवचरित्रकार, ज्येष्ठ इतिहासकार, अशी बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख होती. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरवदेखील केला होता. पण त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संपुर्ण राज्यावर शोकाकूल वातावरण पसरलं आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. तसेच त्यांनी नुकतंच शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं. आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर आणि शिवचरीत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील घराघरात पोहोचलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील  सांस्कृतिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे, तसेच त्यांची कधीही न भरून निघणारी उणीव संपुर्ण महाराष्ट्राला कायम भासेल. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

थोेडक्यात बातम्या

मोठी बातमी! बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली

‘राजकीय गोष्टींवर काही बोलण्यापेक्षा पक्षात प्रवेश करावा’, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

“स्वातंत्र्य भिकेनेच मिळालं आहे, मी कंगनाचं समर्थन करतो”

“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे”

‘…तर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील’; गोपीचंद पडळकरांचा सज्जड इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More