बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

30 वर्ष जुना प्रश्न संपुष्टात, फडणवीसांनी मानले मोदी-शहांचे आभार

नवी दिल्ली | गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तीकर विभागाच्या नोटीसेस येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय घेत आता साखर कारखान्यांना 2016 नंतरचा आयकर लागणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि लगेचच त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केल्याबद्दल आज नवी दिल्ली येथे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकर्‍यांना अधिक दर दिल्याने कारखान्यांना नोटीसेस येत होत्या. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केसेस प्रलंबित होत्या. यासंदर्भात गेल्या आठवड्यातच एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ते दर देताना सक्षम प्राधीकरणांच्या मान्यता घेण्यात आल्या होत्या, मात्र, अनेक कारखान्यांना नोटीस आल्या होत्या. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली, असं देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मोदी सरकार किती गतिमान निर्णय घेते, याचा पुन्हा परिचय आला आणि अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय झाला. 2016 नंतरचे कर आता रद्द केले आहेत. त्यापूर्वीच्या कराबाबत निर्णय करण्यासाठी संसदेची मान्यता घ्यावी लागणार आहे, ती सुद्धा प्रक्रिया यथावकाश होईल. यातून शेतकर्‍यांचा सुद्धा मोठा फायदा होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल”

“पेगासस प्रकरणाची ऑर्डर पंतप्रधान मोदींनी किंवा गृहमंत्र्यांनी दिली”

“अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं”

एमपीएससीची मोठी घोषणा! PSI, STI, ASO मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

“त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More