बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानी सत्तासंघर्ष टोकाला, दोन्ही सर्वोच्च नेेते गायब

काबूल | अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे. कित्येक वर्ष रक्तरंजीत क्रांती केल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकशाहीला तालिबाननं पायाखाली तुडवलं आहे. दहशतवादी गट कधी मोठी सत्ता चालवू शकत नाहीत याचाच प्रत्यय तालिबानच्या आपापसातील भांडणावरून जगाला येत आहे.

तालिबान दहशतवादी आफगाणिस्तानची सत्ता सांभाळण्यात अपयशी ठरत आहेत. अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे. पंतप्रधान पदाचा सर्वात मोठा दावेदार असणारा मुल्ला अब्दुल गनी बरादर याला उपपंतप्रधान पदावर समाधान मानावं लागलं. परिणामी हक्कानी नेटवर्क, आयएसआय, तालिबान यांच्या भांडणाला सुरूवात झाली आहे.

विद्य़मान पंतप्रधान हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर यांच्यात सत्तेतील वाट्यावरून जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भांडणात मुल्ला बरादर यांना खूप मारहाण झाली असून तो जखमी आहे. अंखुदजादा मरण पावल्याच्या बातम्या येत असल्यानं पुर्ण अफगाणिस्तान तणावात आहे.

तालिबाननं सत्तेत येताच महिला मंत्रालय बरखास्त केलं आहे. अफगाणिस्तानचं क्रिकेट बोर्ड सुद्धा बरखास्त करण्यात आलं आहे. आयपीएल आणि इतर क्रिकेट स्पर्धा प्रक्षेपण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या सत्तेतील वाद हा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी आपल्या या भांडणावर अजून भाष्य केलेलं नाही.

थोडक्यात बातम्या 

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

“राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे

महात्मा गांधी जयंतीला कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार काॅंग्रेसमध्ये प्रवेश

“पंडित नेहरू, वाजपेयींकडे जम्मू काश्मीरसाठी जे धोरण होतं ते मोदींकडे नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More