शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा सविस्तर
नवी दिल्ली |राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चांणा उधाण आलं होतं. शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली . यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शरद पवारांनी संजय राऊत यांच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्यावर कारवाई करणं चुकीचं आहे, असं पंतप्रधानांना म्हटल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर अगदी स्पष्ट शब्दांमध्ये शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. भाजपसोबत आमचे संबंध नव्हते आणि यापुढेही असणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. अडीच वर्षे होऊन देखील राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही, हे पवारांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ, असं शरद पवार म्हणाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात होणाऱ्या इतर कारवायांबाबत मोदींशी चर्चा झालेली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय होती?”, शरद पवारांचा रोखठोक सवाल
“गांधींबद्दल जे काही बोललो त्याचा…”, कालीचरण महाराज पुन्हा बरळले
पवार-मोदी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले…
“भाजपची कटुता ही राष्ट्रवादीशी नाही तर शिवसेनेशी”; भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात इतक्या रुपयांची घसरण
Comments are closed.