बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’

नवी दिल्ली | भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने काल कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत चीनच्या बिंग जिआओवर दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. चीनच्या खेळाडूला चारी मुंड्या चीत करून सिंधूने विजय मिळवल्याने तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

अशातच एका ट्वीटर युजरने महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांच्याकडे सिंधूला थार भेट देण्याची मागणी केली होती. या युजरला आनंद महिंद्रा यांनी आता उत्तर दिलं आहे. सिंधूच्या गॅरेजमध्ये एक थार आधीच पार्क केली आहे, असं उत्तर आनंद महिंद्रा यांनी दिलं आहे.

या युजरला उत्तर देताना महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुस्तीपटू साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधू एका थारमध्ये दिसत आहेत. हा फोटो 2016 सालचा आहे. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये पी.व्ही.सिंधूने रौप्य तर साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकलं होतं. यानंतर आनंद महिंद्रा यांनी या दोघींनाही एसयूव्ही भेट दिली होती.

दरम्यान, पी. व्ही सिंधूने सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत. तसेच तिच्या या विजयामुळे ती ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 2 पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला तर दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; वाचा आकडेवारी

मेट्रोच्या ट्रायल रनवरून चंद्रकांत पाटील भडकले; अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाले…

‘दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव’; अरविंद सावंत संतापले

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More