बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माय-लेकावर काळाचा घाला!; दोघांच्या एकाचवेळी निघालेल्या अंतयात्रेने सारे हळहळले

जळगाव | ‘नजर हटी तो दुर्घटना घटी ‘ असा बोर्ड प्रवास करताना पाहिला असेल. तरीही भारतात दररोज कित्येक अपघात होतात. वाहन चालवताना चालकांची चुकी असते तर कधी अपुऱ्या रस्तामुळे अपघात घडतात. अशीच एक घटना जळगावच्या एरंडोलमध्ये घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या संथगतीच्या कामामुळे एका शिक्षिकेला आणि तिच्या मुलाला जीव गमवावा लागला.

शाळेेत शिकवणाऱ्या कविता चौधरी नावाच्या शिक्षिका आपल्या मुलाला घेऊन शाळेकडे निघाल्या. वाटेत त्यांनी गाडीतले पेट्रोल संपले म्हणून गाडी पेट्रोलपंपाकडे वळवली. पेट्रोल पंपावरून निघाल्यावर काहीच अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर चौपदरी करनाचे काम चालू होते. त्यातच कविता चौधरी यांच्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात आई मुलाचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. स्थानिकांनी यानंतर गर्दी केली. राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने काम चालू असल्याने हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि सहाय्य निरीक्षक तुषार देवरे घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात घेऊन गेले.

दरम्यान, कविता चौधरी आदिवासी वस्तीतील शाळांमध्ये शिकवत होत्या. मुलांना स्वच्छ पाणी मिळावे त्यासाठी त्यांनी शाळेत स्वखर्चाने शाळेत प्युरीफायर बसवले होते. तर शाळेच्या परिसरात मुलांना चांंगल्या सोई सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्याच्या जाण्याने विद्यार्थांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द खरा करून दाखवला

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More