बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

मुंबई | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे इशारे-नगारे वाजत असतानाच केंद्र सरकारने आणखी एका ‘पॅकेज’ची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे ज्या क्षेत्रांना फटका बसला आहे अशा क्षेत्रांसाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. सुमारे 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा हा ‘बुस्टर डोस’ आहे. यातील 50 हजार कोटी रुपये आरोग्य सुविधा उभारण्यासाठी तर उर्वरित 60 हजार कोटी इतर क्षेत्रांसाठी असतील, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

मृतांची संख्या आणि वेग एवढा भयंकर होता की, अंत्यसंस्कारांसाठी स्मशाने अपुरी पडली. तेथे मृतदेहांच्या रांगा लागल्याची भीषण दृश्ये मनाचा थरकाप उडविणारी होती. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात तर कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह गंगेत सोडून देण्याची वेळ जनतेवर आली होती. या सर्व अनुभवांनी सरकार शहाणं झालं म्हणा किंवा उशिरा शहाणपण सुचलं म्हणा, सरकारने आरोग्य सुविधांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं हे चांगलंच झालं. त्यातील 23 हजार कोटी अर्भक आणि बालकांवरील उपचारांसाठी खर्च केले जाणार आहेत, असं शिवसेनेनं म्हटलंय.

बाल आरोग्यासाठी हा निधी असल्याने राज्यांनाही त्याचा लाभ लवकर होऊ शकतो, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्याचा फायदा कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देताना होऊ शकेल. कारण या लाटेचा एक इशारा लहान मुलांबाबत आहे. कोरोना महामारीने आरोग्यच नव्हे तर सर्वच क्षेत्रांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे त्यांचेही आर्थिक लसीकरण गरजेचेचं होतं, असंही शिवसेनेनं म्हटलंय.

दरम्यान, सरकारकडून जाहीर होणारी आर्थिक पॅकेज ही तशी टीकेची धनीच होत असतात. या टीकेत तथ्य नसतं असं नाही. पण कोरोना महामारीमुळे तडाखा बसलेल्या सर्वच क्षेत्रांना आर्थिक मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करणं केंद्र सरकारचं मुख्य कर्तव्यच आहे, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?, उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ”

“पंजा फक्त टायगर जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय”

वाह! घरगुती गॅस सिलेंडरवर 900 रुपयांचा कॅशबॅक; ‘ही’ आहे भन्नाट ऑफर!

वारकऱ्यांनो आळंदीच्या वारीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- बंडातात्या कराडकर

…म्हणून ट्विटरवर चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More