जयपूर | राजस्थानमधील बूंदी गावातील दोन तरुणांनी एकाच वेळी रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांचे मृतदेह दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे रुळांजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. तसेच आत्महत्या कारण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या हातावर त्यांच्या प्रेयसीचं नाव लिहिलं होतं.
देवराज गुर्जर आणि महेंद्र गुर्जर अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघे दबलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केशवपुरा गावचे रहिवासी आहेत. देवराज आणि महेंद्र एकाच मुलीच्या प्रेमात होते. त्यांच्या हातावर ‘आशा’ नाव आढळून आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही भावांनी त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. मी उचलेल्या पावलासाठी त्याला आणि त्यानं उचलेल्या पावलासाठी मला जबाबदार धरू नये, असं या दोघांनी व्हिडीओत म्हटलं आहे. .
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कलम 174 खाली गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. दोघांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
थोडक्यात बातम्या-
अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट कल्पना; हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री!
‘बाळासाहेब थोरातांकडून घटनाबाह्यरितीने काम’; ‘या’ शिवसेना खासदाराचा थोरातांवर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक!
तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !
Comments are closed.