बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात नवरदेवानं नवरीच्या पायावर डोकं टेकवलं, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची कहानी!

मुंबई | कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. या लाॅकडाऊन काळात अनेक लग्न पार पडलेली पहायला मिळाली. तसेच लग्नाचे अनेक भन्नाट किस्सेही पहायला मिळाले. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोत एक नवरदेव नवरीच्या पाया पडताना दिसत आहे. हा व्हायरल झालेला फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सहसा पती परमेश्वर म्हणून बायको आपल्या नवऱ्याच्या पाया पडत आली आहे. पण पहिल्यांदाच एका नवऱ्यानं आपल्या बायकोच्या पाया पडल्या आहेत.

हा फोटो डॉ. अजीत वारवंडकर यानी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, नवरदेव-नववधूने एकमेकांना माळा घातल्यानंतर नवरदेवाने नववधूच्या पायावर डोकं टेकलं आणि लग्नात उपस्थित असलेले सगळेच हैराण झाले.

दरम्यान, या फोटोवर नवरदेवाकडून उत्तर देताना डॉ. अजित यांनी लिहिलं, माझ्या वंशाला तिच पुढं नेणार, माझ्या घराची ती लक्ष्मी असणार आहे, माझ्या आई-वडिलांची काळजी घेणारी, त्यांची सेवा करणारी तिच असणार, प्रसूतीच्या वेळी माझ्या बाळासाठी होणाऱ्या मरणयातना सहन करणारी तीच असणार, माझ्या घराचा पाया ती असणार आणि तिच्या वागणूकीतूनच माझी ओळख होणार आहे. तिच्या जीवाभावाच्या माणसांना सोडून तिनं माझ्याशी नातं जोडलं आहे. जर ती माझ्यासाठी एवढं सगळं करु शकते तर मी तिला तेवढा सन्मान देऊ शकत नाही का? स्त्रीयांच्या चरणी डोकं ठेवणं विनोदी वाटत असेल तर मला जगाची पर्वा नाही.

 

थोडक्यात बातम्या – 

लहानशा पक्ष्याला वाचवायला गेला शार्कजवळ अन् पुढं जे झालं ते पाहून तुम्हाली बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

कोरोना रुग्णांसाठी देशभरातील हॉस्पिटल्सला 1000 बेड्स देणार- युवराज सिंह

कोरोना काळात ‘मस्ती की पाठशाला’; ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर

‘मी लग्न करणार नाही कारण माझा…’; तुषार कपूरने सांगितलं खरं कारण!

लहान मुलाला समोर बघताच वाघाने केला हल्ला अन्…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More