बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

पुणे |  21 जून 2015 पासून जागतिक योग दिन साजरा होऊ लागला. योग दिनाला जगभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत असून या दिवशी अनेक ठिकाणी एकत्रितपणे योगसाधना केली जाते. आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येतोय. प्रत्येक जण योगाबद्दल बोलताना दिसून येतोय. अशातच जागतिक याेग दिनानिमित्त पुणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते.

पुण्यात सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सुर्यदत्ता ‘कलाआरोग्यम् योगाथॉन 2021’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक योग दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 जणांनी सलग दोन तास विविध आसनांच्या माध्यमातून योगा केला आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरिताबेन राठी यांच्या हस्ते सलग दोन तास उत्कृष्ट योग करणाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया उपस्थित होते.

दरम्यान, सर्वांनी कलेच्या सादरीकरणातून योगासने केल्यानं एक विश्वविक्रमी नोंद झाली आहे. त्यातून कलेचा आणि आरोग्याचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला. या ‘कलाआरोग्यम् योगाथॉन’ची दखल विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले आहे. असं सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं- राज ठाकरे

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; नव्या चर्चांना उधाण

“सत्ता गेल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, पण कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More