बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साताऱ्यातील पाटणमध्ये घरांवर दरड कोसळली, तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

सातारा | महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसानं थैमान घातलं आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पुरामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अशातच आता सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई आणि पाटण तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम साताऱ्यात दाखल झाली. घरांवर दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे या परिसरातील अनेक वीज खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचण येत आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

साताऱ्यात देवरुखवाडीयेथेही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाच घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. मात्र नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. 27 नागरिकांची सुटक करण्यात आलेली असून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातही पावसामुळे हाहाकार उडाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळीही वाढत आहे. आज कोयना धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

थोडक्यात बातम्या –  

“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची पहिली पोस्ट, म्हणाली….

तरूणीच्या विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत; ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्य सरकारमुळे कोकणात पूरस्थिती- प्रवीण दरेकर

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More