नवी दिल्ली | अटल बिहारी वाजपेयी 10 वर्षाचे असतानाचा त्यांचा एक किस्सा चांगलाच प्रसिद्ध आहे. अटलजी तेव्हा आग्रा शहरात रहायला होते.
अटलजी आणि त्यांचे मित्र यमुना नदीवर जायचे. यावेळी त्यांचे मित्र नदीत पोहायला उतरायचे. मात्र अटलजींना पोहता येत नसल्याने ते किनाऱ्यावर बसून राहायचे. यावरुन त्यांचे मित्र त्यांना नेहमी चिडवायचे.
एक दिवस अटलजींना राग आला. त्यांनी नदीत उडी मारली. पोहता येत नसल्यामुळे ते बुडायला लागले. तेवढ्यात काही मित्रांनी अटलजींना नदीतून बाहेर काढले. या प्रसंगानंतर काही दिवसांनी अटलजी पोहायला शिकले.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!
-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?
-जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…
-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…
-अटल बिहारी वाजपेयींच्या निधनावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?