Top News

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या 9 आठवडयांपासून दिल्लीच्या अटल बिहारी वाजपेयींवर उपचार सुरु होते. 24 तासांपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये धाव घेतली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी एम्समध्ये रांग लावली होती. 

दरम्यान, वाजपेयी 2009 पासून अंथरुणाला खिळले होता. त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. या आजारामध्ये वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होत जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती

-अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या