बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेहरूंच्या स्मृतीदिनी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपला टोला, पाहा व्हिडीओ

मुंबई | देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतीदिन आहे. पंडित नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलं जातं. देशातील अनेत दिग्गज नेत्यांनी स्मृतीदिनानिमित्त नेहरूंना अभिवादन केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील खास पद्धतीत नेहरूंना अभिवादन केलं आहे. त्यांनी फेसबुकवर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेय यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी भाजपला चिमटे देखील काढले आहेत.

गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला व यापुढेही होत राहील, असं टोला जयंत पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून लगावला आहे.

भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषणात म्हटलं होतं.

पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्य मानलं. 1999 सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरव पूर्ण उल्लेख अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या-

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

“सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा धोका वाढला; गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 मॉडेल्सची सुटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More