Loading...

अटल बिहारी वाजपेयींचा आज पहिला स्मृतिदिन; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या स्मृतीदिननिम्मीत दिल्लीमध्ये देशातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा यांनी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं आहे.

वाजपेयींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी त्यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिका यांनी हजेरी लावली.

Loading...

सदैव अटल स्मृती स्थळावर वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वाजपेयींच्या स्मृतीदिनानिमित्त सदैव अटलवर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, वाजपेयींनी गेल्यावर्षी 16 ऑगस्ट 2018ला अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनात सक्रीय नव्हते.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-प्रत्येक रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते- धनंजय मुंडे

-शरद पवारांना वाटतं आम्हीच ज्ञानी आहोत- विखे पाटील

-बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?; ट्विटरवर ट्रेंड सुरु

-पबजी खेळण्याचं व्यसन लागलं; अन् त्यासाठी चोरल्या 8 सायकली

-“हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा…”

Loading...