Atal Pension Yojana | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) १ फेब्रुवारी रोजी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, सरकार अटल पेन्शन योजनेबाबत (Atal Pension Yojana) मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, सरकार या योजनेतून मिळणाऱ्या पेन्शनची (Pension) रक्कम दुप्पट करून ती १०,००० रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता आहे.
सध्या अटल पेन्शन योजनेतून (Atal Pension Yojana) १,००० ते ५,००० रुपये पेन्शन दिली जाते. ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याने दिलेल्या योगदानावर (Contribution) अवलंबून असते. २०१५-१६ मध्ये सुरू झालेली ही योजना गरिबांना आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक सुरक्षा (Financial Security) प्रदान करते.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला (Nominee) पूर्ण रक्कम मिळते.
अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक.
अर्जदाराचे बँक खाते (Bank Account) असणे बंधनकारक.
नोंदणी अर्ज बँकेतून (Bank) किंवा बँकेच्या वेबसाइटवरून (Website) डाउनलोड (Download) करता येतो.
अर्ज भरून, पेन्शनचा पर्याय निवडून, आधार कार्ड (Aadhaar Card) आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जमा करावा लागतो.
६० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडण्याचे पर्याय
वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर संबंधित बँकेला किमान किंवा कमाल मासिक पेन्शनसाठी विनंती अर्ज करावा लागतो. त्यानंतर दरमहा पेन्शनची रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा होते.
खातेदाराचा मृत्यू झाल्यास संबंधित रक्कम त्याच्या वारसदारांना मिळते.
खातेदार ६० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडू इच्छित असल्यास, त्याने जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळालेले निव्वळ उत्पन्न (व्याज) त्याला दिले जाईल. मात्र, खात्याचा मेंटेनन्स चार्ज (Maintenance Charge) कापून घेतला जाईल.
खातेदाराचा ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला किंवा मुलांना ते खाते सुरू ठेवण्याचा पर्याय दिला जातो. (Atal Pension Yojana)
पेन्शन वाढीची शक्यता
अटल पेन्शन योजनेतील (Atal Pension Yojana) किमान पेन्शनची रक्कम वाढवून १०,००० रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
Title : Atal Pension Yojana Pension Amount Likely to be Doubled