वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video

Atal Setu Viral Video | अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आत्महत्या करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस तिथे आले आणि त्यांनी महिलेचे प्राण वाचवले. याचा थरारक व्हिडिओ (Atal Setu Viral Video) आता व्हायरल झाला आहे.

अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या महिलेने म्हटलं आहे. झालं असं की, 16 ऑगस्टरोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली.

अटल सेतूवरील थरारक व्हिडिओ व्हायरल

यावेळी महिलेने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने महिलेला धरून ठेवले. तेवढ्यात वाहतूक पोलिस देखील तिथे आले.

या वाहतूक पोलिसांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि समयसुचकतेमुळे या महिलेचा जीव वाचला आहे. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेनंतर सदर महिलेने पोलिस जबाब (Atal Setu Viral Video) देखील दिला आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या या 56 वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असल्याची माहिती मिळत आहे.

वाहतूक पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण

या महिलेने देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असं पोलिस जबाबात सांगितलं आहे. तसेच एका वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर (Atal Setu Viral Video) एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.”

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला ही अपत्यहीन असल्याने काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच घटनेच्या वेळी तिचा पती पुण्यात होता.

News Title- Atal Setu Viral Video of women

महत्वाच्या बातम्या-

देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…

तब्बल 1 महिन्यांनी इंधनदरात घसरण?; जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

कुंभ, मकर, मीनसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा, भाग्य उजळणार!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?; मुख्य निवडणूक आयुक्तांनी अखेर सांगितलं

काका पुतण्यात दिलजमाई?, युगेंद्र पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण