अहमदनगर महाराष्ट्र

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

अहमदनगर | रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडेल थंड, असं म्हणत रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी आणि जाणार आहे महाविकासआघाडी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही, असं आठवले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”

विरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा- सतेज पाटील

“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

1 जानेवारीपासून हे पाच नियम बदलणार; प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या