Top News पालघर महाराष्ट्र

उद्धवजींचं सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं- रामदास आठवले

Photo Courtesy-Twitter/RamdasAthawale & uddhav thackeray

पालघर | कवितेसाठी प्रसिद्ध असणारे रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पुन्हा चर्चेत आले आहेत. रामदास आठवलेंनी त्यांच्या काव्यशैलीत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यासोबतच आठवलेंनी मराठा समाजाच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी केली आहे. आदिवासी बहुजन मेळाव्यात रामदास आठवले यांनी ही मागणी केली.

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मनरेगाचे काम करणाऱ्या आदिवासींना अद्याप वेतन दिलं नाही हे चुकीचं आहे. उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं, असं रामदास आठवले म्हणाले.  पालघरमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. मराठा समाजाला एससी, एसटी, ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये त्यांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं. कथित सवर्ण समाजातील गरीबांना ज्या प्रकारे 10% आरक्षण देण्यात येतं त्याप्रकारे देशातील कथित क्षत्रिय समाजाला 10% आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आठवले यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

दरम्यान, रिपाईकडून पालघर जिल्हातील दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयाेजित केला होता. येत्या 25 फेब्रुवारीला गरीब भुमीहिनांसाठी 5 एकर जमिन देण्यात यावी यासाठी आंदोलन करणार असल्याचं रिपाईकडुन सांगण्यात आलं आहे. आरपीआय आणि कुणबी ,समाज एकत्र आला तर मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल, असं कुणबी सेना प्रमुख विश्वास पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘या’ भाजप नेत्याला ड्रग्ज घेण्याची सवय, कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा

महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ

पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या पाहून अजित पवार म्हणाले…

“अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग दुसऱ्यांना सल्ला द्या”

अमित शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने बजावले समन्स!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या