औरंगाबाद महाराष्ट्र

“संधीची वाटच पाहतोय, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू”

पालघर | औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याने, उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे सांगता येत नाही. या संधीची आम्ही वाटच बघत असून, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पालघरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये तणाव असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

आमच्या 117 आमदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असं आठवले यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी”

“उद्धव ठाकरे पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही”

“मी कोरोनाची लस घेणार नाही, कोरोनाचे किती अवतार येऊदे मला काही होणार नाही”

“‘त्या’ मध्यरात्री मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता…’; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितली अंदर की बात

‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आहे’; सोनिया गांधींची मोदी सरकारवर जहरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या