लखनऊ | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित युवतीच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलीस संरक्षण देणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच आठवलेंनी पीडित कुटुंबाला सांत्वनपर 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
पीडित दलित युवतीच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत रिपब्लिकन पक्ष या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
पाच हजार तास वाट पहावी लागली तरी हटणार नाही- राहुल गांधी
नरेंद्र मोदी कायर, आमचं सरकार असतं तर चीनला 15 मिनिटात हाकललं असतं- राहुल गांधी
हाथरस पुन्हा हादरलं; 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार?- किरीट सोमय्या