बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत

टोकियो |  जपानमध्ये ऑलम्पिकमची जोरदार तयारी चालू आहे. कोरोना महामारीच्या काळात स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन करणं आयोजकांना मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदा काही नवे निमय लागू केले आहेत. परंपरेनुसार खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना कंडोम दिले जातात त्याप्रमाणे यंदाही 1 लाख 60 हजार कंडोम देण्यात आले आहेत. मात्र खेळाडूंना ते वापरता येणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने सुरक्षित लैंगिक संबंध आणि एचआयव्ही रोखण्याला प्रोत्साहन देण्यासाठी 1988 मध्ये स्पर्धेत कंडोम देण्याची प्रथा सुरू केली होती. गेल्यावर्षी 4 लाख 50 हजार कंडोम वाटण्यात आले होते. मात्र यंदा संख्या कमी करण्यात आली आहे.

आयोजकांनी खेळाडूंना कंडोम दिले आहेत मात्र त्यांना ते तिथे वापरण्यास मनाई घालण्यात आली आहेे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावरच कंडोमचा वापर करायचा असल्याचं सांगितलं आहे. कंडोममुळे खेळाडू कोणाच्याही संपर्कात येऊ शकतात. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कंडोमचा वापर करायचा नाही, असं आयोजन समितीने सांगितलं आहे.

दरम्यान, 2021 च्या ऑलम्पिकमध्ये जवळपास 1 1 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. अकरा हजार खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम देण्यात आल्याची माहिती आहे. यंदा ऑलम्पिकमध्ये वैश्विक आरोग्य अभियानाचा भाग म्हणून खेळाडूंना एकमेकांना स्पर्श न करण्यास सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

काहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ

पाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More