नवी दिल्ली | फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही, असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
प्रत्येक नागरिकाला गरजेइतके पोटभर अन्न मिळणे, कपडे आणि निवारा मिळणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. देशात कोणताही भेदभाव असता कामा नये, असं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
‘जय हिंद’ म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानींचा जय होणे, असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक हिंदुस्थानींचा विचार करणे आणि त्यांची काळजी घेतल्याने प्रत्येक हिंदुस्थानींचा जय शक्य असल्याचं नायडू म्हणाले.
दरम्यान, फक्त राजकीय बंधनातून मुक्ती एवढाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्याचा उद्देश नव्हता. संपत्तीचा समान अधिकार प्रत्येकाला हवा, देशात कोणताही भेदभाव आणि सामाजिक बंधने नसावीत, असं स्वातंत्र्य बोस यांना अभिप्रेत होतं, असं नायडू यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”
अनैतिक संबंधांमध्ये पैसा ठरला वरचड; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!
सुंदर मुली दाखवायच्या अन्… तुमच्यासोबतही हा प्रकार घडत असेल तर सावधान; पोलिसांचं आवाहन
“श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?”
Comments are closed.